मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज गोरेगावत एक कार्यक्रम होता. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कारण मनसेच्या या कार्यक्रमात चक्क स्टेज कोसळल्याचे दिसून आलं. राज ठाकरे याच स्टेजवर उभे होते. त्याच्या थोडा मागे स्टेज खचला. सुरूवातील यात काही महिलाही अडकल्याचे दिसून आले. मात्र राज ठाकरे सुरक्षित आहे. त्यांना या गोंधळात काहीही झालं नाही. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असते. राज ठाकरेंच्या सभेला मैदानेही तुडुंब भरतात. हाच प्रकार आज गोरेगावात झाला. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळेच स्टेज कोसळल्याचे बोलले जाते. यानंतर राज ठाकरेंनी स्टेजच्या पुढच्या भागात सरकत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. मात्र स्टेज कोसळ्यल्याने काही काळ याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी राज ठाकरेंनी काळजी घेण्याचे आवाहनही केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शाखेचं काम कसं असावं याचं मार्गदर्शन करतानाच मनसे सैनिकांना त्यांनी जाहीपणे तंबीच दिली. या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ही शाखा आहे दुकान नाही, अशी तंबीच राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाखा बांधणीपासून ते विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज साकीनाक्यात मनसेने शाखेची स्थापना केली आहे. साकीनाक्यात मनसेचं वर्चस्व होतं. मात्र, काही नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे साकीनाक्यात पुन्हा एकदा मनसेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत आहे.