Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दुचाकी चोरट्यांना अटक ( एक जण फरार )

कोल्हापूर : दुचाकी चोरट्यांना अटक ( एक जण फरार )

कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरून त्याचे स्क्रॅप करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात लक्ष्मीपुरी पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून २ लाख रुपये किंमतीच्या चोरीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. अमित चंद्रकांत हात्तीगोटे (वय ३२, रा. साने गुरुजी वसाहत), जमीर मौला लाड (वय ३५, रा. उचगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर रशीद जमादार हा अद्याप पसार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. क्राईम आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे रोखण्याचे आदेश दिले होते. लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी उपनिरीक्षक विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमले होते. या पथकाने साध्या वेशात महानगरपालिकेच्या पाठीमागे असणाऱ्या पार्किंगवर लक्ष ठेवले होते. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दुचाकी चोरून नेताना अमित हात्तीगोटे व जमीर लाड यांना अटक केली.

हे दोघे चोरलेल्या दुचाकी आपला मित्र रशीद सिकंदर जमादार यास देत होते. वाहनांचे चेस नंबर व नंबर प्लेट बदलून त्या ग्रामीण भागात कमी पैशाला विक्री केल्या जात होत्या. अटक केलेल्या दोघांकडून १० दुचाकी जप्त केलेल्या आहेत. तिसरा संशयित रशीद जमादार याचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल संजय कोळी, गजानन परीट, रणजित देसाई, संदीप कुंभार, सुहास पाटील, तानाजी दावणे, प्रतीक शिंदे, ईशाद महात, मंगेश माने, नीलेश चव्हाण यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -