कोल्हापुरात मोटरसायकल चोर गजाआड झाले आहेत. तरुणांच्या सतर्कतेमुळे बाईक चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे बाईक चोरीचा उलगडा झाला. दुचाकी चोरांच्या सराईत टोळीकडून पोलिसांनी तब्बल दहा बाईक जप्त केल्या आहेत. अमित हत्तीकोटे आणि जमीर लाड अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत. तर त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ भागातील तरुणांच्या सतर्कतेमुळे बाईक चोरीची घटना उघडकीस आली आहे.
कोल्हापुरात मोटरसायकल चोरांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे बाईक चोरीचा प्रकार उघडकीस आला. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ भागातील तरुणांच्या सतर्कतेमुळे बाईक चोरीची घटना उघडकीस आली आहे.
दुचाकी चोरांच्या सराईत टोळीकडून पोलिसांनी तब्बल दहा बाईक जप्त केल्या आहेत. अमित हत्तीकोटे आणि जमीर लाड अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावं आहेत. तर त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.