Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानतत्काळ तिकीट बुक करण्यासाठी तयार केले दुसरे अॅप, IRCTC वेबसाइटवरून करू शकता...

तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी तयार केले दुसरे अॅप, IRCTC वेबसाइटवरून करू शकता डाउनलोड

तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला जाण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी तत्काळ तिकीटाची गरज पडते. त्यामुळे यासाठी आता स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप फक्त IRCTC वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अचानक प्रवास करण्याची गरज भासल्यास या अॅपद्वारे तुम्ही घरी बसून तत्काळ तिकीट सहज बुक करू शकाल.

हे अॅप आयआरसीटीसीच्या (IRCTC) प्रीमियम पार्टनरच्या वतीने कन्फर्म तिकिट नावाने दाखवण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला तत्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांची माहिती मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या ट्रेनचे नंबर टाकून उपलब्ध जागा शोधण्याची गरज भासणार नाही. उपलब्ध तत्काळ तिकिटांची माहिती त्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध असेल. हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरूनही डाउनलोड करू शकता.

या अॅपमध्ये तिकीट बुकिंगसाठी मास्टरलिस्टही देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रवासासाठी आवश्यक असलेली माहिती अगोदर सेव्ह करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट काढताना वेळेचा अपव्यय होणार नाही. तत्काळ तिकिटांचे बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होताच तुम्ही तुमच्या सेव्ह डेटाद्वारे तिकिटांचे बुकिंग करू शकाल. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट होताच तिकिट बुक होईल. हे लक्षात घ्या की हे तिकीट वेटिंगही असू शकते आणि कन्फर्म देखील असू शकते. अॅपचे नाव कन्फर्म तिकीट असे ठेवण्यात आले असले तरी तत्काळ तिकिटांमध्येही तुम्हाला फक्त बर्थ उपलब्ध असेल तरच कन्फर्म तिकिट मिळेल.

हे अॅप आयआरसीटीसी नेक्स्ट जनरेशन मोबाइल अॅपवरूनही डाउनलोड केले जाऊ शकते. सण-उत्सवांच्या काळात सामान्य कोट्यातून कन्फर्म तिकीट मिळत नसल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत तत्काळ कोट्यातून कन्फर्म तिकीट बुक करणे थोडे सोपे होते. मात्र त्यासाठी जास्त शुल्क भरावे लागते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -