सोशल मीडियामुळे युजर्समध्ये फोटोजची क्रेझ पूर्वींपॆक्षा आधी वाढली आहे. आजकाल युजर्स चांगला कॅमेरा सेटअप असणारे स्मार्टफोन खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. म्हणूनच, अनेक स्मार्टफोन कंपन्या डिव्हाइसला लाँच करताना प्रामुख्याने चांगला कॅमेरा देत असतात. सध्या व्हिडीओ, फोटो इत्यादी गोष्टींची आवड लोकांमध्ये वाढली आहे. अशामुळे कंपन्या देखील चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा फोनमध्ये देण्याचा प्रयत्न करतात. रियलमी,सॅमसंग सारख्या कंपन्या फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा ऑफर करतात. यूजर्स देखील फोन खरेदी करताना सर्वात आधी कॅमेऱ्याची गुणवत्ता कशी आहे ते आवर्जून पाहतात. बाजारात १०८ मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेऱ्यासह येणारे अनेक दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही देखील चांगल्या क्वालिटी कॅमेऱ्यासह येणारा फोन शोधत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहेत. यात Realme 8 Pro, Moto G60 सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
Motorola Edge 20 Fusion: या स्मार्टफोनमध्ये ६ GB RAM सह १२८ GB इंटरनल मेमरी आहे. यात ६.६७ इंचाचा डिस्प्ले आहे. Motorola Edge 20 Fusion मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आहे, तर फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Motorola Edge 20 Fusion मध्ये ३२ -मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला आधी पॉवरफुल बनविण्यासाठी Motorola Edge 20 Fusion मध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत २१,४९९ रुपये आहे.
Mi 11i Series: या स्मार्ट फोनमध्ये ६ GB RAM सह १२८ GB इंटरनल मेमरी आहे. यात ६.६७ इंचाचा डिस्प्ले आहे. Mi 11i फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आहे. तर, फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ -मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला अधिक पॉवरफुल बनविण्यासाठी Mi 11i मध्ये फोनची बॅटरी ५१६० mAh ची बॅटरी आहे. फ्लिपकार्टवर Mi 11i ची किंमत २४,९९९ रुपये आहे.
Redmi Note 10 Pro Max: या स्मार्टफोनमध्ये ६ GB RAM सह १२८ GB इंटरनल मेमरी आहे. यात ६.६७ इंचाचा डिस्प्ले आहे. Redmi Note 10 Pro Max फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा आहे. तर फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Redmi Note 10 Pro Max मध्ये १६-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ५०१० mAh आहे. फ्लिपकार्टवर Redmi Note 10 Pro Max ची किंमत २१८७५ रुपये आहे.