Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्य विभागाच्या परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

आरोग्य विभागाच्या परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर हजारो उमेदवार आरोग्य विभागाच्या परीक्षांकडे डोळे लावून बसले आहेत. याच परीक्षांसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. गृह विभागाचा अहवाल आल्यानंतर लवकरच आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात येतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. आज ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “पोलिस विभागाचा अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेबाबत निर्णय घेतला जाणार असून गृहमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली आहे. लवकर पोलिसांचा अहवाल आल्यास त्याबद्दल लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची इच्छा आहे”

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी अगदीच कमी झालेली आहे, असं नाही. पण मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. परिस्थिती बघून लागू असलेले छोटे-मोठे असे सर्वच निर्बंध 100 टक्के हटवण्यात येतील. निर्बंध हटवावे अशी मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेयांनी सांगितलं.

मार्च महिन्यानंतर राज्यात 100 टक्के अनलॉक केलं जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कमी झालेली नाही असंही टास्क फोर्सने स्पष्ट केलंय. टाक्स फोर्सच्या भूमिकेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -