Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगअंबरनाथचं शिवमंदिर महाशिवरात्रीला बंद, गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्यांचा निर्णय

अंबरनाथचं शिवमंदिर महाशिवरात्रीला बंद, गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्यांचा निर्णय

ताजी बातमी ऑनलाइन टीम

अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. ही यात्रा महाशिवरात्रीला भरणारी महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा असते. कारण तब्बल 5 ते 6 लाख भाविक या एका दिवशी अंबरनाथमध्ये येतात. मात्र मागील 2 वर्षांपासून कोरोनामुळं ही यात्रा झालेली नाही. यंदाही यात्रा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज अंबरनाथ नगरपालिकेत

शिवमंदिराचे परंपरागत पुजारी असलेले पाटील कुटुंबीय, अंबरनाथ पालिका प्रशासन आणि पोलीस यांची बैठक पार पडली

अंबरनाथ पालिकेकडून पुजाऱ्यांच्या निर्णयाचं स्वागत
या बैठकीत गर्दी होऊ नये, यासाठी पुजारी पाटील परिवारानं स्वतःहून यावर्षी सुद्धा महाशिवरात्रीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतचं लेखी पत्र अंबरनाथ नगरपालिकेला देण्यात आलं असून अंबरनाथ पालिकेनं या भूमिकेचं स्वागत केलंय. दरम्यान, यंदा मंदिर भाविकांसाठी जरी बंद राहणार असलं, तरी परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराकडून दरवर्षीप्रमाणे मंदिरात धार्मिक विधी मात्र केले जाणार आहेत. रात्री 12 वाजता महादेवाला अभिषेक आणि महाआरती करून मंदिर बंद केलं जाईल अशी माहिती मंदिराचे परंपरागत पुजारी रवी पाटील यांनी दिली आहे. मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राचीन शिवमंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं होतं. सध्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिर दैनंदिन दर्शनासाठी सुरू आहे. मात्र महाशिवरात्रीला मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता एक दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय योग्य ठरणार आहे.

अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर यंदाच्या महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुलं ठेवावं, अशी मागणी भाजपनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची रविवारी भेट घेऊन केली आहे. भाजप शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले यांच्यासह भाजप शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत ही मागणी केली आहे. यावर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्याने शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवावं, अशी मागणी भाजपचे अंबरनाथ शहर अध्यक्ष अभिजित करंजुले यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची शिष्टमंडळासह भेट घेत त्यांनी याबाबतचं निवेदन दिलं असून या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -