ताजी बातमी ऑनलाइन टीम
हिंदी मालिकेत सासूच्या भूमिका (glamorous mother in Law) साकारणाऱ्या अभिनेत्री रिअल लाईफमध्ये खूपच हटके आहेत. त्यांचा ग्लॅमर लूक अनेकांना भावत आहे. अशाच काही अभिनेत्रीबाबत जाणून घेऊया
अनुपमा या मालिकेत आजीचा अभिनय करणारी अल्पना बुच आपल्या लूक्सची खास काळजी घेताना दिसून येते. तिचा पाश्चात्य लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिला कोणीही अनुपमाची आजी आहे, असे म्हणणार नाही.
बालिका वधू २’ या मालिकेत आनंदीच्या सासूची भूमिका स्मिता बंसल यांनी साकारली आहे. परंतु स्मिता बंसल खऱ्या आयुष्यात अविवाहित आहे. तिला टीव्ही विश्वात मोठे ग्लॅमर मिळालेले आहे. अनेक वेळी स्मिताने बिकिनी घालून खळबळ उडवून दिली आहे.
नियती जोशी (Niyati Joshi)
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत भूमिका करणाऱ्या नियती जोशीने आपल्या हटके अदाने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. नियतीच्या हॉट फोटोवरून नजरा हटत नाहीत.
अनीता राज (Anita Raaj)
‘छोटी सरदारनी’ मालिकेतील अनीता राज आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. अनीता राजचा आपली फिगर मेंटेन ठेवण्याकडे कटाक्ष असतो. त्यामुळे कोणत्याही आउटफिटमध्ये ती आकर्षक दिसते.
सुभावी चौकसी (Shubhaavi Chouksey)
सुभावी चौकसी हिने ‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेत प्रिया च्या सासूची भूमिका केली आहे. ती खऱ्या आयुष्यात खूप स्टाइलिश आहे. तिच्या पुढे अनेक मॉडेल फिका पडत आहेत.
कृतिका देसाई (Kruttika Desai)
टीव्ही अभिनेत्री कृतिका देसाई ‘पांड्या स्टोर’ या मालिकेत धारा च्या सासूचे पात्र साकारत आहे. देशी वेषात दिसत असणारी कृतिका देसाई खऱ्या आयुष्यात मोठी ग्लॅमरस आहे. कृतिका देसाईचे फोटो पाहिल्यानंतर हे लक्षात सुद्धा येत नाही.