Sunday, December 22, 2024
Homenewsचिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चोपण्याचा प्रयत्न, महिला आघाडीचा संताप

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चोपण्याचा प्रयत्न, महिला आघाडीचा संताप

धरणगावातील सहा वर्षीय चिमुकलीवर एका ६२ वर्षीय वृध्दाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्याला काळे फासून चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांच्या सतर्कतेने महिलांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

याबाबत माहिती अशी की, “धरणगाव शहरातील एका भागात संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे ( वय – ६२) याची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकांसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. त्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल मराठे याने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. पीडीत मुलीच्या आई व वडीलांना धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंदुलाल मराठे याच्यावर पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -