Monday, December 23, 2024
Homenewsडॉ. सुवर्णा वाजेंना सॅनिटायझर टाकून जाळले; पण खून कसा केला, संशयिताने कोर्टात...

डॉ. सुवर्णा वाजेंना सॅनिटायझर टाकून जाळले; पण खून कसा केला, संशयिताने कोर्टात काय दिली कबुली?

नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांना खुनानंतर सॅनिटायझर टाकून जाळल्याची कबुली बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के याने कोर्टात दिली आहे. म्हस्के हा मुख्य संशयित आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपचा मावसभाऊ आहे. विशेष म्हणजे त्याच्यावरही बायकोच्या खुनाचा आरोप असून, तो सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. त्यानंतर त्याने डॉ. सुवर्णा वाजे यांना संपवण्यासाठी संदीपला मदत केल्याचे समोर आले. संदीप आणि म्हस्केचे मोबाईल लोकेशन डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तेथे आढळून आले होते. त्यावरून पोलिसांनी संदीपनंतर म्हस्केला उचलले आहे.

डॉ. सुवर्णा वाजे-जाधव बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 25 जानेवारी मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुख्य संशयित संदीप वाजेचा साथीदार म्हस्केची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने ही कबुली दिली. आता त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. संशयित म्हस्केने आपल्या पत्नीचा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचपर्यंत छळ केला होता. तसाच सल्ला त्याने आपल्या मावसभावाला दिला. मात्र, डॉ. सुवर्णा वाजे पतीच्या छळाला पुरून उरल्या. तेव्हा त्याने त्यांचा खून केला असावा, अशी शक्यताय.

डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपच्या कारमधून पोलिसांनी चाकू जप्त केलाय. मात्र, संदीप काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे डॉ. वाजे यांचा खून कसा झाला, कसा केला हे अजून समोर आले नाही. मात्र, खुनानंतर संशयिताने त्यांना जाळल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे संदीपचा मावसभाऊ म्हस्केनेही खून कसा केला याची कबुली अजून दिली नाही. दोघेही सराईत गुन्हेगारासारखे वागून पोलिसांची दिशाभूल करण्यात पटाईत असल्याचे समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -