Monday, September 16, 2024
Homeराजकीय घडामोडीराष्ट्रवादीनंतर शिवसेना रडारवर! मुंबईत बड्या नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

राष्ट्रवादीनंतर शिवसेना रडारवर! मुंबईत बड्या नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्डिरग प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अटक केली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी सकाळी छापा टाकला. BMC निवडणुकीच्या तोंडावर आली असतानी ही कारवाई झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी, की प्राप्तकर विभागाचे पथक इनोव्हा गाड्यांमधून शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. सीआयएसएफचे पथकाने जाधव यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर कोविड घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. तसेच गेल्या जानेवारी महिन्यात सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर प्राप्तीकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत, असा गौप्यस्फोट देखील सोमय्या यांनी केला होता. यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आपण प्राप्तीकर विभागाला पाहिजे ती मदत करू असे, देखील सोमय्या यांनी सांगितले होते.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आनंदराव अडसूळ ही नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -