Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाआयपीएलचं बिगूल वाजलं! येत्या 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात; मुंबईत 55 मॅच

आयपीएलचं बिगूल वाजलं! येत्या 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात; मुंबईत 55 मॅच

अखेर इंडियन प्रीमियर लीग 2022 चं बिगूल वाजलंय. यंदाच्या आयपीएल सत्राला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुरुवारी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या सत्रातील आयपीएल मॅचला येत्या 26 मार्चपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी जगासह भारतावर कोरोनाचे संकट होते. भारतात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. त्यामुळे आयपीएलचे सामने भारताबाहेर झाले होते. मात्र यंदा सर्व सामने भारतातच होणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन सामने आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या आयपीएलचे बुहुता:श सामने हे पुणे आणि मुंबईतच खेळवले जाणार आहेत. मुंबईत 55 तर पुण्यात 15 मॅच खेळवण्यात येणार आहेत.

यंदा आयपीएलचे 55 सामने हे मुंबईत तर 15 सामने पुण्यात खेळवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या सामन्यांपैकी 20 सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, 20 सामने डीवाय पाटील स्टेडियमवर तर सीसीआयमध्ये 15 सामने होणार आहेत. तर पुण्यात 15 सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काउंसीलच्या वतीने देण्यात आली आहे. आयपीएलच्या नियोजनासाठी आज पुन्हा एकदा आयपीएल गव्हर्निंग काउंसीलची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदा अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन नवीन संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएल सत्रात प्रेक्षकांना मैदानात जाऊन मॅच पाहाण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -