Sunday, August 24, 2025
Homeराजकीय घडामोडीनवाब मलिकांना भर चौकात फाशी द्या; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

नवाब मलिकांना भर चौकात फाशी द्या; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

डी गँग संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार महेश लांडगे यांची जीभ घसरली आहे. नवाब मलिक यांना चौकात फाशी द्या असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात भाजप कडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी मलिक यांचा एकेरी उल्लेख करत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
देशद्रोही मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे लांडगे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीतील कोणत्या ना, कोणत्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्ट्राचाराचे आरोप होत आहेत. नवाब मलिक यांच्यावर जो आरोप आहे. हा या हिंदुस्थानमधील नागरिक सहन करणार नाहीत. मलिकचा राजीनामा घेतला, तरी देशवासीय त्याला माफ करणार नाहीत, एवढा गंभीर आणि संतापजनक आरोप त्याच्यावर आहे. मुंबई बॉम्बस्फोट घडवणाऱ्या देशद्रोही दाऊदसाठी तो काम करीत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, त्यामुळे त्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -