Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू: विलीनीकरणाच्या लढ्यातील कर्मचारी

एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू: विलीनीकरणाच्या लढ्यातील कर्मचारी

कराड एसटी आगारातील उपोषणात सहभागी एका बस चालकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आटके येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय- 42) यांचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपात चालक सहभागी होते, त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्यावरून निर्णय होत नसल्याने चिंतेत होते.

मिळालेली माहिती अशी, कराड आगारातील बस चालक बाळासाहेब पाटील यांना आज शनिवारी दि. 26 रोजी पहाटे हदयविकाराचा झटका आला. त्यांना कृष्णा हॉस्पीटल येथे उपचासाठी आणण्यात आले. मात्र त्यांचा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कराड बस आगारातील कर्मचाऱ्यांनी कृष्णा हॉस्पीटलकडे धाव घेतली.

कराड आगारात बाळासाहेब पाटी यांनी जवळपास 18 वर्षे सेवा बजावली आहे. गेल्या 110 दिवसापासून सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या लढ्यात ते सहभागी होते. गेल्या काही दिवसापासून ते अर्थिक विवंचनेत असल्याचे काही सहकाऱ्यांनी सांगितले. आपल्यातील चालकाचा अचानक मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांच्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई- वडिल असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -