देशाला ब्रिटीश साम्राज्याच्या गुलामगिरीतून मुक्त कारण्यासाठी अनेक स्वात्रंत्र्य सेनानींनी आपले योगदान दिले आहे. यात प्रखर हिंदुत्ववादी नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर, ब्रिटीशांविरुद्ध पुकारलेल्या लढ्यामुळे त्यांना 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली. तरीही न डगमगता त्यांनी लढा सुरूच ठेवला. इंग्रजांच्या तावडीतून हुशारीने सुटत अवघा समुद्र त्यांनी पार केला. त्यांचा प्रखर हिंदुत्ववाद आणि देशभक्तीची मुळे स्वातंत्र्य लढ्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. अशा या स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1 फेब्रुवारी 1966 रोजी अन्न त्यात करून औषधी सोडून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर 26 दिवसांनी भारत मातेच्या या वीर सुपुत्राची प्राणज्योत मालवली. प्रखर हिंदुत्ववादी देशभक्त असलेले स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांची आज (26 फेब्रुवारी) पुण्यतिथी आहे. वीर सावरकर आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही प्रत्येक भारतीयाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देतात. स्वातंत्र्य वीर सावराकार यांचे काही विचार आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत जे तुम्ही तुमचे मित्र परिवार, नातेवाईक किंवा इतरांना शेअर करू शकता.
हे आहेत वीर सावरकरांचे विचार…
आपल्या प्रामाणिक पणाचा उपयोग होईल पण, केव्हा? तर दुसऱ्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच ! -वीर सावरकर
अनेक फुले फुलती ! फुलोनिया सुकून जाती !!
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे !!
मात्र अमर होय ती वंशलता ! निर्वंश जिचा देशाकरिता !!
-वीर सावरकर
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
-वीर सावरकर
आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी यावे ना येवो. जे आपल्याला करावसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.
-वीर सावरकर
देहाकडून देवाकडे जातांना देश लागतो आणि या देशाचाही आपण देणे लागतो.
-वीर सावरकर
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमिचा तारा. प्रसाद इथे भव्य परी मज, भारी आईची झोपडी प्यारी.
-वीर सावरकर
हे मातृभूमी, तुजसाठी मरण तें जनन, तुजविण जनन ते मरण.
-वीर सावरकर