ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 10 षटकात 2 बाद 71 धावा केल्या आहेत.
दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर श्रीलंकेने संघात २ बदल केले आहेत. दुसऱ्या टी-२० मध्ये पावसामुळे खेळाची मजा खराब होऊ शकते. धर्मशाळेतही हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी आणि दिवसभरही पाऊस झाला.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल
श्रीलंका संघ :
पाथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असलंका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंता चमीरा, लाहिरु कुमारा, बिनुरा फर्नांडो, दनुष्का गुणतिलक