या विशेष प्रवेश प्रक्रियेद्वारे अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार 13 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज (Indian Army NCC Special Entry 2022) करू शकतात. NCC स्पेशल एंट्री स्कीममध्ये उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅडेट म्हणून प्रशिक्षित केले जाईल. प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना अधिकारी पद दिले जाईल.
Indian Army NCC Special Entry 2022 : महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 मार्च 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022
Indian Army NCC Special Entry 2022 : पात्रता आणि वयोमर्यादा
उमेदवारांकडे एनसीसी प्रमाणपत्र तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 50% गुणांसह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. उमेदवाराने एनसीसीच्या वरिष्ठ विभागात/विंगमध्ये किमान तीन वर्षे सेवा केलेली असावी. तसेच सी प्रमाणपत्रात किमान बी ग्रेड असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराचे वय 19 ते 25 वर्षांदरम्यान असावे.
भारतीय लष्करात 47 पदांसाठी भरती
याशिवाय, भारतीय लष्करामध्ये 47 पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय लष्करातील विभागात गट सीच्या ग्रुप सी (Indian Army Group C Recruitment 2022) अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मार्च आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 47 पदे भरली जातील. यात न्हावी, चौकीदार, कूक, LDC, धोबी या पदांचा समावेश आहे. भरती संदर्भातील अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी आणि अर्ज कऱण्यासाठी उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.