Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरसकल मराठा समाजाचा इशारा : मागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून कोल्हापूर बंद

सकल मराठा समाजाचा इशारा : मागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून कोल्हापूर बंद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संभाजी महाराज गेले दोन दिवस आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवारी, दोन मार्च रोजी कोल्हापूर बंदची घोषणा केली आहे. सरकारने मंगळवारी, (ता.१ मार्च) सायंकाळी पाच मरा वाजेपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या आरक्षण संबंधी निर्णय घ्यावा, अन्यथा बुधवारी कोल्हापूर बंद पुकारला जाईल असे सकल मराठा समाजाने म्हटले आहे.

कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय झाला. सोमवारी, २८ फेब्रुवारी पासून कोल्हापुरात विविध पद्धतीची आंदोलने सुरू करण्याचे ठरले. संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. सोमवारी हळदी बंदची हाक देत रस्ता रोको होणार आहे. कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला.

सकल मराठा सहभागी होत, पाठींबा व्यक्त केला. दिवसभर पाठींबा देण्यासाठी दसरा चौकातील आंदोलनस्थळी रीघ लागली होती. आरक्षण तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाई लढूनही मराठा समाजाची केवळ आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. त्यामुळे आता आरपारची लढाई म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून राज्यभरातून विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. दसरा चौकामध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्या शेजारी कोल्हापूरातील सकल मराठा समजातर्फे साखळी उपोषण सुरू आहे.

आंदोलनस्थळी बाबा पार्ट, उदय घोरपडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शैलजा भोसले, महादेवराव अडगुळे, प्रताप घोरपडे, ग्राहक कल्याण फौंडेशनचे अरूण यादव, रविशंकर चिटणीस, महेश जोले, रणजीत ससे, प्रकाश रणदीवे, सात्ताप्पा गायकवाड, सविता पाटील

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -