Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याच्या नियमात झाले मोठे बदल, RTO कार्यालयात जाण्याची गरज...

ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याच्या नियमात झाले मोठे बदल, RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही!

तुम्हाला सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स तयार करुन घ्यायचे आहे का? तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी यापुढे तुम्हाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात सतत फेऱ्या मारण्याची, लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याचे नियम अतिशय सोपे केले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांनुसार, यापुढे तुम्हाला आरटीओला जाण्याची किंवा त्याठिकाणी जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले असून हे नियम लागू झाले आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांचे नाव आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमधील टेस्टची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी करू शकता. तुम्हाला ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी टेस्ट करावी लागेल. अर्ज करणाऱ्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलकडून सर्टिफिकेट दिले जाईल. या सर्टिफिकेटच्या आधारे अर्ज करणाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल.

अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की, दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांना किमान एक एकर जागा असली पाहिजे. तर मध्यम आणि अवजड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी दोन एकर जागा असणे आवश्यक आहे.

ट्रेनर किमान 12वी पास असावा. तसंच उमेदवाराला किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असला पाहिजे आणि वाहतूक नियमांची जाण असावी.

– केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अध्यापनाचा अभ्यासक्रमही ठरवून दिला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी कमाल 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. तसेच या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम लेखी आणि प्रॅक्टिकल अशा दोन भागांमध्ये विभागला जाईल.

– लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतार इत्यादींवर वाहन चालवायला आणि शिकण्यासाठी २21 तास घालवावे लागतात. यात लेखी भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल. यामध्ये रस्ता शिष्टाचार समजून घेणे, रस्त्यावरील वाहन चावण्याचा अंदाज, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता यांचा यासर्वांचा अभ्यास क्रमात समावेश असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -