Sunday, December 22, 2024
Homeनोकरी10 वी पासला मोठी संधी ! नौदलात 10वी पास अणाऱ्यांसाठी भरती, जाणून...

10 वी पासला मोठी संधी ! नौदलात 10वी पास अणाऱ्यांसाठी भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज!

नौदलामध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी आहे. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडने ग्रुप सी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे फायरमन , फार्मासिस्ट आणि पेस्ट कंट्रोल वर्कर या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात 26 फेब्रुवारी 2022 रोजी रोजगार वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार ही भरती जाहीर झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे या पदांच्या भरतीसाठी फक्त संरक्षण कर्मचारी अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील –
फायरमन-120 पदं
फार्मासिस्ट – 1 पदं
पेस्ट कंट्रोल कर्मचारी – 6 पदं

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि अधिसूचना पाहावी लागेल किंवा रोजगार वृत्तपत्रात प्रकाशित केलेल्या जाहिरातीतून ते ही माहिती पाहू शकतात.

वयोमर्यादा –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 56 वर्षे असावे.

असा करा अर्ज –
नौदलाच्या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी अर्ज भरावा. इतर आवश्यक कागदपत्रांसह फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, टायगर गेट जवळ, मुंबई- 400001येथे अर्ज पाठवू शकतात.

(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -