कराड तालुक्यातील तळबीड बेलवडे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेन वरती आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीचा अपघात झाला. यामध्ये दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलवडे हद्दीत अचानक गाडीचा टायर फुटल्याने गाडी चालकाचा ताबा सुटला. यावेळी गाडी दोन पलट्या मारुन महामार्गावरून सर्व्हिस रस्त्यावर पलटी झाली. यावेळी गाडीमध्ये गजानन
कमलाकर सानप (वय 45), विनायक परसराम जाधव (वय 45,दोघे रा. कोल्हापूर)अशी नावे आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, प्रकाश गायकवाड, मानसिंग सुर्यवंशी, विक्रम सावंत तसेच महामार्ग पोलिस कर्मचारी व तळबीड पोलिस स्टेशन चे कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.