Monday, December 23, 2024
Homeअध्यात्ममहाशिवरात्रीला असा करा 'रुद्राभिषेक', क्षणास नाहिसे होतील सर्व रोग आणि दुःख

महाशिवरात्रीला असा करा ‘रुद्राभिषेक’, क्षणास नाहिसे होतील सर्व रोग आणि दुःख

ताजी बातमी ऑनलाईन टीम

यजुर्वेदानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाने ग्रह-नक्षत्रांचे वाईट प्रभाव दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. महाशिवरात्री हे पवित्र पर्व 1 मार्च, मंगळवारी साजरे करण्यात येणार आहे.

महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. रुद्राभिषेकाचा महिमा वेदांमध्येही वर्णिला आहे. रुद्राभिषेक घरी किंवा शिवमंदिरात केल्यास खूप फायदा होतो. रुद्राभिषेक केल्याने ग्रह-नक्षत्रांचे वाईट प्रभाव संपतात. यासोबतच आयुष्यात येणारे अडथळे दूर होतात, असे यजुर्वेदात सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊ या रुद्राभिषेकाचा योग्य विधी…



रुद्राभिषेक करण्यासाठी शिवलिंग उत्तर दिशेला ठेवावे. अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आपले मुख पूर्व दिशेला असेल अशा स्थितीत बसावे. सर्वात आधी अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने शिवलिंगपर गंगाजल टाकवे. अभिषेकाला सुरुवात करावी. रुद्राभिषेकादरम्यान, महामृत्युंजय मंत्र, शिव तांडव स्तोत्र, शिव पंचाक्षर मंत्र (नमः शिवाय) किंवा रूद्र मंत्राचा जप करावा. पूजा करताना शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा. बेलपत्र, सुपारी आणि इतर पूजा सामग्री शिवलिंगावर अर्पण करावी. शिवशंकराला नैवेद्र दाखवावा.

शिव मंत्राचा 108 वेळा जप करावा. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन शिवशंकराची आरती म्हणावी. आरती झाल्यानंतर अभिषेकाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. अभिषेकदरम्यान, शिव मंत्रांचा जप करावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -