महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात लवकरच पाळणा हलणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूनबाई मिताली आणि पुत्र अमित ठाकरे लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या कुटुंबाचे नवीन निवासस्थान शिवतीर्थावर सध्या आनंदाचे वातावरण आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या खांद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यावेळी अमित ठाकरेंच्या राजकीय प्रमोशनची चर्चा रंगली होती. मात्र, सध्या ते वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. येत्या एप्रिल महिन्यात अमित ठाकरे याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती आहे.
राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ निवासस्थान सोडून नुकतेच सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या बंगल्यात राहण्यास गेले आहेत. या गुड न्यूजमुळे ठाकरे परिवारात उत्साहाचं वातावरण पसरले आहे.
कोण आहे मिताली ठाकरे?
मिताली ठाकरे फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मिताली प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. मिताली आणि अमित ठाकरे २७ जानेवारी २०१९ रोजी विवाहबंधनात अडकले होते. कॉलेजमध्ये असतानाच दोघांच्यामध्ये मैत्री झाली होती.