गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेन वर जोरदार हल्ला केला असून सर्वत्र गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्याने युक्रेन हादरले आहे. याच दरम्यान, खारकीव शहरातील एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
युक्रेन मधील खारकीव शहरात रशिया कडून सुरू असलेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. नेमका कोण हा विद्यार्थी होता याबाबत अधिक माहिती समोर आली नसली तरी भारतासाठी ही अत्यंत दुर्दैवी बातमी आहे.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, मी अत्यंत दुखाने सांगत आहे की, खार्किव येथे झालेल्या हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सध्या मंत्रालय विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. आमच्या संवेदना कुटुंबासोबत आहेत.