Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाIPL सामन्यांवेळी स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

IPL सामन्यांवेळी स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

महाराष्ट्रात होत असलेल्या आयपीएल  स्पर्धेच्या  सामन्यांसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांत स्टेडियममध्ये 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. आठ दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची राज्य सरकारची  तयारी आहे. येत्या 26 मार्चपासून IPL सामन्यांना सुरूवात होणार आहे 22 मेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12:30 वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात होत असलेल्या आगामी IPL सामन्यांच्या आयोजनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) पदाधिकारी आणि BCCI चे CEO उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -