Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगराज्यात 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल, सरकारकडून नवी नियमावली जारी

राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल, सरकारकडून नवी नियमावली जारी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात कोरोनाच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संध्या देखील कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध (Corona Restrictions in Maharashtra) काही शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारकडून नवी नियमावली (New Guidlines) जारी करण्यात आली आहे. या नुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 4 मार्चपासून हे नवे नियम (New rules) लागू होणार आहेत.




14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल
राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार (New Guidlines) ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची स्थिती (Corona situation in maharashtra) सुधारत आहेत त्या जिल्ह्यांचा ‘A’ श्रेणीत समावेश (‘A’ category districts) करण्यात आला आहे. तर उर्वरीत जिल्ह्यांचा समावेश ‘B’ श्रेणीत करण्यात आला आहे. ‘A’ श्रेणीत 14 जिल्हे असून यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे 100 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने काही निकष ठरवले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 70 टक्क्यांहून अधिक आणि पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -