रशिया व युक्रेन युद्धाचा आज आठवा दिवस आहे. या आठ दिवसात साऱ्या जगाने बेचिराख युक्रेन बघितलं आहे. दोन दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसध्ये वाटाघाटीवर चर्चा झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने युद्ध सुरुच राहिले. आज पुन्हा या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी होणार होती. मात्र युक्रेनने रशियाशी चर्चा करण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे हे युद्ध थांबण्याची शक्यताही लांबणीवर गेली आहे. या युद्धात युक्रेनचेही मोठी नुकसान झाली आहे. मात्र रशियाचे 9 हजार सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन अजूनही झुकलेला नाही. अनेक भारतीय लोकही सध्या युक्रेनमध्य अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगाना हलचाली सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि सल्लागार समितीची याच मुद्द्यावर आज बैठकही पार पडलीय. तशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.
रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव आणला जात आहे. अमेरिकेकडून रशियावर मोठ्याप्राणात आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियाची सर्वच बाजुने कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. बुधवारी ‘यूएनजीए’ कडून रशियाचा निषेध करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. यावेळी रशियाच्या विरोधात 141 देशांनी मतदान केले तर पाच देशांनी रशियाच्या बाजूनं मतदान केले. तर 35 देश तटस्त राहिले. तटस्थ देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश होतो. भारत तटस्थ राहिल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.