अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही चांगलाच वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ओबीसी आरक्षणावरून विधीमंडलात भाजप आक्रमक होणार असून, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण विरोधात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.
युद्ध थांबवायचं असेल तर पुतीनला संपवणं गरजेचं; अमेरिकन खासदाराचं धक्कादायक विधान
विधीमंडळ कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणारा आहे. विधानभवनात थोड्याच वेळात प्रमुख नेत्यांची बैठक आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देण्याबाबत बैठकीत चर्चेची शक्यता आहे. नवाब मलिकांचा राजीनाम्यासाठी भाजप आग्रही आहे. तर ओबीसी आरक्षण रद्द मुद्दाही विधानसभेत गाजणार आहे. त्यामुळे रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण, सुभाष देसाईंसह मविआचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलाय. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारलाय. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
त्यामुळे मुदत उलटलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देशही कोर्टानं दिले.