Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगसावधान!  रेल्वेत तुम्ही 'असं' करत असाल तर होईल दंड, जाणून घ्या नवीन...

सावधान!  रेल्वेत तुम्ही ‘असं’ करत असाल तर होईल दंड, जाणून घ्या नवीन गाइडलाइन्स

रेल्वेने  तुम्ही नेहमी प्रवास करत असाल किंवा लवकरच प्रवासाच्या बेतात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. होळी जवळ आली आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या गावाकडे किंवा सुट्टीनिमित्त बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. यात लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. अशातच रेल्वेने प्रवासासंदर्भात नवीन नियम  जाहीर केले आहेत. हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला विनाकारण दंड भरावा लागू शकतो.  त्यामुळे रेल्वे प्रवास करण्यापूर्वी जाणून घेऊया रेल्वेत रात्री झोपण्या संबंधीचे  नवीन नियम…

प्रवाश्यांना चांगल्या दर्जाची सुविधा देता यावी यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे अनेक नियम बनविण्यात आले आहे. या नियमात परिस्थितीनुसार बदल होत असतात. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. आता प्रवाशांच्या तक्रारीवरून रेल्वेत रात्री झोपण्याबाबत देखील रेल्वेकडून काही गाडलाईन जारी करण्यात आल्या आहेत….

खुशखबर! निवृत्तीचे वय आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता; निर्णय सरकारच्या विचाराधीन

रात्रीच्या वेळी प्रवाशांची झोपमोड होणार नाही यासाठी नव्या नियमानुसार आता तुम्हाला तुमची सीट, डब्यात किंवा डब्यातील कुठेही मोबाईलवर मोठ्याने बोलता येणार नाही. किंवा मोठ्या आवाजात गाणी देखील ऐकू शकणार नाही. यामुळे कोणत्याही प्रवाशाला झोप मोड होण्याचा त्रास होणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आता रेल्वेमध्ये शांतपणे झोपू शकतात.

मोबाईलवर गाणी ऐकण्यासोबत प्रवासी मोठमोठ्याने बोलतात, हसतात आणि विनोद देखील करतात. यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. अशा तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या आहे. यासह लोक रेल्वेमध्ये रात्रभर दिवे सुरु ठेवतात यामुळे देखील प्रवाशांमध्ये वाद होतो. त्यामुळे यासंदर्भात देखील रेल्वेने नवीन नियम तयार केले असून ज्यामध्ये रात्री 10 वाजेनंतर रेल्वेमधील दिवे बंद करावे लागतील. मात्र नाईट लॅम्प चालू ठेवावा लागेल. हे नियम तातडीने लागू करण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व झोनला आदेश जारी केले आहे. नवीन नियमानुसार कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास ती सोडविण्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्याची असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -