सरकारच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो, पण अडकलेल्या लोकांची आम्हाला चिंता आहे, अशी टिप्पणी यावर न्यायालयाने केली.
याचिकाकर्ता असलेली बंगळुरूची ए. फातिमा आणि इतर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना तसेच न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाला सांगितले. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या विनंतीच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या होत्या.
Jhund : बडी फिल्म बडे परदे पर, नागराज मंजुळेचा ‘झूंड’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला
संकटात सापडलेल्या लोकांच्या कुटुंबियासाठी एक मदत केंद्र स्थापन करण्यात यावे, असा सल्ला खंडपीठाने सरकारला दिला. या आधीच्या चुकांतून आपण काहीही शिकलेलो नाही. अजूनही युद्ध सुरू आहे, अशी टिप्पणी सरन्यायाधीश रमणा यांनी सुनावणीदरम्यान केली.