ताजी बातमी ऑनलाईन टीम
पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर शहर मोठ्या बॉम्बस्फोटाने (Peshawar Bomb Blast) हादरले आहे. पेशावरमधील जामा मशीदीमध्ये आत्मघाती हल्ला (Peshawar Suicide Attack) करण्यात आला आहे. नमाज पठणाच्या वेळी गर्दीला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटामध्ये 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ पेशावरमधील लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या जिओ न्यूजने (Jio News) दिलेल्या वृत्तानुसार, पेशावरमधील जामा मशिदीमध्ये (mosque bomb blast) शुक्रवारी नमाज पठण सुरु होते. त्याचवेळी आत्मघाती हल्ला करण्यात आला. पेशावर जिल्ह्यातल्या कोच्या रिसाल्दर परिसातील किस्सा ख्वानी बाजारात असलेल्या या मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. या आत्मघातील हल्ल्यामध्ये दोन हल्लेखोर सहभागी होते. नमाज पठणाच्या वेळी हे दोघे मशिदीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर या हल्लेखोरांनी गोळीबार सुरु करत स्वत:च स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.