ताजी बातमी ऑनलाईन टीम
रशिया (russia) आणि युक्रेनचं (ukraine) युद्धामुळे अनेक कंपन्यांना अर्थिक फटका बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. पण रशियाने आता सोशल मीडियाच्या (social media) कंपन्यांना टार्गेट केलं असून त्यांनी फेसबुक, ट्विटर, युट्यूब बंद म्हणजे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया कंपन्यांवर आरोप केला आहे की, या कंपन्या रशियाच्या कंपन्यांशी भेदभाव करीत आहेत. यानंतर फेसबुकने आपली भूमिका जाहीर केली असून ते म्हणतात की, त्यांच्या या निर्णयामुळे फेसबुकपासून तिथले लाखो लोक वंचित राहतील. रशियाच्या मिडीयाच्या विरोधात भेदभाव केल्याची आत्तापर्यंत 26 प्रकरण समोर आली आहेत. त्यामध्ये काही समाचार एजन्सींचा सुध्दा समावेश आहे. त्यामुळे रशियाच्या सरकारकडून देशात फेसबुक, ट्विटर, युट्यूब पुर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच युद्धाचे परिणाम दिसून यायला सुरूवात झाल्यानंतर अनेक राष्ट्रीय कंपन्यांनी युक्रेन आणि रशियामधून आपला पाय काढता घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक मोठ्या कंपन्या तिथून आपला व्यवसाय हलवण्याची शक्यता आहे. युद्धाचा परिणाम व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर दिसून येतोय.
फेसबुकच्या मालकांचं भावनिक ट्विट
आत्तापर्यंत अनेकांनी फेसबूकसह इतर सोशल मीडियाच्या कुटुंबियांमध्ये तुम्ही सहभागी होता. काहीवेळात तुम्ही आमच्यापासून दुरावला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्यावेळी आमच्यापासून दुरावला झालं. त्यावेळी तुमचा आवाज बंद केला जातोय असं ट्विट मार्क जुकरबर्ग केलं जातंय. या आठवड्यात मेटाने जाहीर केले की तिने संपूर्ण युरोपियन संघात आरटी आणि स्पुतनिक वर बॅन केले. रशियन सरकार मीडिया इन आऊटलेट्स फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम सिस्टम्सच्या सोबत फेसबुकवर इन मीडिया कंपनी लिंक्स पोस्ट करण्यासाठी मेटा विश्व स्तरावर डिमोट देखील करत आहे.
रशियातले लाखो चाहते राहणार वंचित
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला ज्यावेळी सुरुवात झाली, त्यावेळी तिथं फेसबुकने काही भागातला सोशल मीडिया बंद करण्यात आला होता. युद्धाच्या काळात जे युद्ध सुरू आहे, त्या भागातले मेटा कंपनीचे सोशल मीडियाचे सगळे अॅप बंद करण्यात आले होते. त्यांनंतर रशियाच्या मीडिया कंपन्यांशी फेसबुक भेदभाव करीत असल्याचा दावा करण्यात आला. जेव्हा फेसबुक सुरू करण्याबाबत रशियाकडून सांगण्यात आले तेव्हा फेसबुकने त्यांच्याकडे कानाडोळा केला होता. आता रशियाने फेसबुक, ट्विटर, युट्यूब बंद केल्याने तिथल्या लोकांना वंचित रहावे लागणार आहे.