Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रएकतर्फी प्रेमातून अल्‍पवयीन मुलीचा खून; संशयिताचाही आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

एकतर्फी प्रेमातून अल्‍पवयीन मुलीचा खून; संशयिताचाही आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव येथे एकतर्फी प्रेम प्रकरणातून युवकाने अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. संशयित युवकानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. निखिल राजेंद्र राजे (वय २५, रा. पिंपोडे बुद्रुक) असे संशयित युवकाचे नाव आहे.

याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथील एक अल्पवयीन मुलगी अकराववी मध्ये शिकत होती. आज (रविवार) सकाळी ती खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी गेली होती. संशयीत युवकाने क्लासमध्ये जावून तिला चाकुने भोकसले व घटनास्थळावरून तो पसार झाला.

गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने सातारा येथील एका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, संबंधीत युवकानेसुध्दा विषारी औषध प्राशन केले. त्याला कोरेगाव येथील दवाखान्यात दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -