उद्या संजय राऊत यांची पत्रकार परिषद
उद्या संध्याकाळी 04 वाजता होणार पत्रकार परिषद
सेनाभवनमध्ये होणार पत्रकार परिषद
संजय राऊत यांनी ट्विट करून दिली माहिती
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एकदा शिवसेना (Shivsena) भवन इथं पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट द्वारे उद्या सांयकाळी शिवसेना भवन येथे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलंय. संजय राऊत यांनी यापूर्वी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या हे होतं. त्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोम्मया आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता. गेल्या काही दिवसांमधील महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत नेमक काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.
संजय राऊत नेमकं कशावर बोलणार?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारनं त्यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतील आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.