Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानAirtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार

Airtel-Axis Bank चे क्रेडिट कार्ड, फायद्याचे भंडार

भारती एअरटेल आणि अक्सिस बँकेने (Axis Bank) वित्त सेवा देण्यासाठी हात मिळवणी केली आहे. दुरसंचार कंपनी एअरटेलने अॅक्सिस बँकेसोबत को-ब्रांडेट क्रेडिट कार्ड बाजारात दाखल केले आहे. या भागेदारीत एअरटेलने ग्राहकांना प्री-अप्रुड कर्ज,बाई नाऊ पे लेटर, कॅशबॅक, विशेष सवलत, डिजिटल व्हाऊचर यासह अनेक ऑफर्सचा (Offers) भडिमार केला आहे. या क्रेडिट कार्डमुळे अक्सिस बँकेला निमशहरी भागात त्यांचा विस्तार करण्यास मदत मिळणार आहे. एअरटेलच्या 34 कोटी ग्राहकांना अक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि विभिन्न डिजिटल ऑफरचा फायदा घेता येणार आहे. भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी सांगितले की, ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल सेवा देण्यासाठी आणि त्यांचा वित्तीय पोर्टपोलिओ तयार करण्यासाठी एअरटेल प्रयत्नरत आहे.

एअरटेल अक्सिस बँक क्रेडिट कार्ड चे अनेक फायदे आहेत. एअरटेल ग्राहकांना कॅशबॅक, विशेष सवलत, डिजिटल व्हाऊचर आणि इतर अनेक अनुषांगिक लाभ मिळतील. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना एअरटेल मोबाईल/डीटीएच रिचार्ज वर 25 टक्के कॅशबॅक, एअरटेल ब्लॅक आणि एअरटेल एक्सट्रीम फाईबरचे बिल अदा करता येईल. एअरटेल धन्यवाद अॅपमार्फत वीज/गॅस/पाणीपट्टी भरता येईल. त्यावर 10 टक्के कॅशबॅक मिळेल. बिग बास्केट, स्विगी, झोमॅटो यावरील खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तर अन्य सर्व खर्चांवर 1 टक्के कॅशबॅक आणि कार्ड अॅक्टिवेशन वर 500 रुपयांचे अॅमेझॉन ई-वाऊचर 30 दिवसांच्या आत मिळेल.

एअरटेल थॅक्स अॅपवर एअरटेल ग्राहकांना क्रेडिट कार्ड विशेष स्वरुपात उपलब्ध होईल. याव्यतिरिक्त, अॅक्सिस बँक डिजिटल क्षमता वाढीसाठी एअरटेल डिजिटल सेवा, जसे की सी-पास प्लॅटफॉर्म-एअरटेल आयक्यू, मॅसेजिंग, व्हिडिओ, स्ट्रिमिंग, कॉल मास्किंग आणि व्हर्चुअल कॉन्टेक्ट सेंटर सोल्युशन्सचा वापर करेल आणि त्याआधारे विस्तार करेल. अक्सिक बँक एअरटेलच्या विभिन्न सायबर सिक्योरिटी सर्व्हिसेसचा वापर करेल. क्लाऊड आणि डेटा सेंटर सेवांचा ही वापर करण्यात येणार आहे.

टेलिकॉम कंपनी ‘SEA-ME-WE-6’ समुद्रात केबलद्वारे हायस्पीड ग्लोबल नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतात डिजिटल सेवांचा वापर वाढला आहे. या सेवांची क्षमता वाढवण्यासाठी एअरटेलने ‘SEA-ME-WE-6 सोबत सामंजस्य करार केला आहे. यासाठी एअरटेलने मोठी गुंतवणूक केली आहे. त्याआधारे कंपनी सक्षम डिजिटल सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -