सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांबद्दल व ईडीबाबत गौप्यस्फोट केला. त्यांच्यानंतर दुसरीकडे अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ क्लिप सभागृहात सादर करत गंभीर आरोप केले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले. खोटेनाटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हे विरोधीपक्ष नेत्याचे कामच आहे. फडणवीसांनी केलेल्या आरोपाचे स्क्रिप्ट कोणी लिहले आहे याच्या खोलाशी राज्य सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेन ड्राइव्ह सादर करेल, असे राऊत यांनी उत्तर दिले.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारकडून सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोधकांवर खोट्या केस लावून त्यांना संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप काल देवेंद्र फडणवीस यांनी केला. खोटेनाटे आरोप करून खळबळ माजविणे हे तर त्यांचे कामच आहे. सभाग्यरिहात विरोधकांकडून बदनामी केली जात असेल तर काहीकाळ थांबावे. फडणवीसांनी एक पेन ड्राइव्ह सादर केला आहार ना आता आम्ही दुसरा पेन ड्राइव्ह सादर करून असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस हे खोटेनाटे आरोप करत आहेत. त्यांच्याकडून जे कुभांड रचले गेले आहे. ते त्यांच्या कडूनच शिकले पाहिजे. मात्र, त्यांना माझा हा प्रश्न आहे कि ते राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल यांनी जे विधान केले. सावित्रीबाई फुले यांच्या त्याबद्दल का बोलत नाहीत, असे राऊत यांनी म्हटले.