Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीएकाच व्यक्तिच्या घरी 90 छापे मारण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला; देशमुखांच्या घरी मारलेल्या...

एकाच व्यक्तिच्या घरी 90 छापे मारण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला; देशमुखांच्या घरी मारलेल्या धाडींची यादी पवारांनी वाचून दाखवली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

(sharad pawar) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून पुन्हा एकदा भाजपवर (bjp) हल्ला चढवला आहे. सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख  यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर तब्बल 90 छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदाच पाहिला आहे, असं शरद पवार म्हणाले.

एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे, याचा अर्थ केंद्राच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि सदर प्रकार हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय आहे, अशी खंत व्यक्त करतानाच कोणत्या यंत्रणेने अनिल देशमुखांच्या घरी किती छापे मारले आणि कुणा कुणावर छापे मारले याची यादीच वाचून दाखवली. ते मीडियाशी संवाद साधत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काही आरोप केले. त्याचे पुरावेही त्यांनी सादर केले. एका पेन ड्राईव्हत काही व्हिडीओ पुरावे आहेत, ते त्यांनी दिले. या व्हिडीओत संबंधित व्यक्तीने माझाही उल्लेख केला आहे. पण व्यक्तिश: या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे. बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे.

ही आमची तक्रार आहे, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -