पंजाबचे निवडणूक निकाल येण्यापूर्वीच आम आदमी पक्षाचा विजयाबद्दलचा आत्मविश्वास दिसून आला आहे. पक्ष कार्यालयाबाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या निकालापूर्वीच सगळीकडे या बॅनरची चर्चा रंगली आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच आम आदमी पक्षाला विजयाबद्दल पूर्ण विश्वास वाटत आहे. निकाल लागण्यापूर्वीच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयाबाहेर आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत.
पक्ष कार्यालयाबाहेर आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये पक्षाचे उमेदवार भगवंत मान यांचे आभार मानणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
पंजाब निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीचा विजय झाल्याचे दाखवले जात आहे. यानंतर पक्षाला आपल्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास वाटत आहे.
पक्ष कार्यालयाबाहेर भगवंत मान यांचे छायाचित्र असलेले आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही ते पांढऱ्या कापडाने झाकलेले आहे. याशिवाय कार्यालयाला आतमध्ये फुले व फुगे लावून सजावट करण्यात आली आहे.