शहरातील गणेशनगर व शाहूनगर या दोन ठिकाणी घरफोडी झाली. 20 लाख 86 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. सांगली शहर आणि संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गणेशनगरमधील पंचदीप निवास येथे सुंदर लखमचंद तिग्यानी हे व्यापारी राहतात. ते दि. 5 मार्च ते दि. 7 मार्च दरम्यान घर बंद करून मुंबईत सत्संगासाठी गेले होते.
चोरट्यांनी त्यांचे घर फोडले.कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व दोन लाख रुपये रोख असा 19 लाख 33 हजार 400 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. तिग्यानी घरी परत आल्यानंतर त्यांनी संयजनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शाहूनगर येथे राहणारे श्रीनिवास रावसाहेब संकपाळ दि. 5 मार्च ते दि. 7 मार्च घर बंद करून गावी गेले होते. त्यावेळी सद्गुरू रेसिडन्सीमधील त्यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला. सोन्या- चांदीचे दागिने व 20 हजार रुपये रोख असा 1 लाख 53 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. संकपाळ घरी परतल्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रेसिडन्सीमधील त्यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला. सोन्या- चांदीचे दागिने व 20 हजार रुपये रोख असा 1 लाख 53 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. संकपाळ घरी परतल्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.