Sunday, December 22, 2024
Homeक्रीडामुंबईच्या टेनिस क्रिकेटचा ‘बादशाह’ ‘कौन प्रवीण तांबे’ चा ट्रेलर रिलीज, दोन मिनिटांचा...

मुंबईच्या टेनिस क्रिकेटचा ‘बादशाह’ ‘कौन प्रवीण तांबे’ चा ट्रेलर रिलीज, दोन मिनिटांचा VIDEO अंगावर काटा आणेल

मुंबई: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या छोट्या पडद्यावरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) लवकरच तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’चा (Kaun Pravin Tambe) ट्रेलर डिझनी हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या प्रवीण तांबेंच्या जीवनावर बायोपिक येत आहे. ‘कौन प्रवीण तांबे’मध्ये श्रेयस प्रवीण तांबेची (Pravin Tambe) भूमिका निभावताना प्रेक्षकांना दिसेल. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एमएस धोनी आणि कपिल देव यांच्या आयुष्यावर चित्रपट आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला सुद्धा उतरले. आता याच मालिकेत क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार आहे. प्रवीण तांबे ही मुंबईमधल्या एका युवा प्रतिभावान क्रिकेटपटूची गोष्ट आहे. ज्याच्यासाठी क्रिकेटच सर्वकाही होतं.

वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू

प्रवीण तांबे हा मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा. इंडियन प्रिमियर लीग सारख्या स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केलेला संघर्ष या चित्रपटातून उलगडला आहे. प्रवीण तांबे हे मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधलं एक मोठ नाव. गल्लीबोळातून वरती आलेल्या प्रवीण तांबेंनी मुंबईच टेनिस क्रिकेट गाजवलंच, पण सीजन बॉलने खेळल्या जाणाऱ्या लेदर क्रिकेटमध्येही आपली ओळख निर्माण केली. तुमच्यात टॅलेंट असेल, तर जग तुमची दखल घेत, हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. क्रिकेटपटूने वयाची पसतीशी ओलांडली की, ते निवृत्ती घेतात. पण प्रवीण तांबेंनी वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केला.

मुंबईतल्या चाळीमधून पुढे आलेल्या मुलाची ही कथा प्रेरणा देईल

‘कौन प्रवीण तांबे’चा ट्रेलर जबरदस्त आहे. हा ट्रेलर तुमच्या अंगावर काटा आणतो. दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रवीण तांबेंना क्रिकेटपटू म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, ते दाखवलंय. तुमच्यात टॅलेंट असलं, तरी वाटेत अनेक अडथळे असतात. ते पार करताना कुटुंब, समाज यांच्याबरोबर कसं लढाव लागतं. समोरच्या माणसाच्या अविश्वासाचं दु:ख कसं पचवाव लागतं ते सर्व या चित्रपटातून मांडलं आहे.

नोकरी करताना प्रवीणने क्रिकेट सोडलं नाही. शेवटपर्यंत संघर्ष केला आणि यश मिळवलं. मुंबईतल्या चाळीमधून पुढे आलेल्या मुलाची ही कथा नक्कीच प्रेरणा आणि जोश निर्माण करणारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -