Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगमहाराष्ट्र अर्थसंकल्प : मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी निधी

महाराष्ट्र अर्थसंकल्प : मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी निधी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प (दि. ११) सादर करत आहेत. अर्थसंकल्यात अजित पवार यांनी मुंबई विद्यापीठातील भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. लता मंगशेकर यांचे यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते.



काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. तसेच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे अजित पवार यांनी जाहीर केले.

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार देण्याची घोषणा केली होती. पण काही आर्थिक अडचणीमुळे हे अनुदान झाले नव्हते. पण या घोषणेची वचनपूर्ती आता केली जात आहे. यामुळे २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी २०२२-२३ या वर्षात १० हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -