मिरज / प्रतिनिधी
ॲपेक्स हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे व अपुर्या व्यवस्थेमुळे ८७ पेक्षा जास्त निष्पाप पेशंट मयत झाले होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टी चे वतीने अॅपेक्स च्या डाॅक्टरांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.तसेच अॅपेक्स हॉस्पिटल ला अपुरी कागदपत्रांच्या आधारे सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परमिशन दिली होती. पेंशटच्या मुत्युस डाॅक्टरांच्या बरोबर महापालिकेचे अधिकारी ही तेवढेच जबाबदार आहेत. तरी दिलेल्या परमिशन ची चौकशी करून कारवाई च्या मागणी साठी १९ जुन २०२१ रोजी सांगली महापालिकेच्या महासभेदिवशी महापालिकेवर मयत पेंशटच्या नातेवाईकांच्या समवेत तिरडी मोर्चा काढुन आंदोलन केले होते. व भाजप च्या नगरसेवकांनी महासभेत आवाज उठविला होता. त्यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी रुलींग दिले होते. प्रशासनास अॅपेक्स हॉस्पिटल ला दिलेल्या परमिशची चौकशी करून चौकशी अहवाल महासभेच्या समोर सादर करण्याचे आदेश दिले होते.
आदेश देऊन ६ ते ७ महिने झाले आहेत अजुन ही त्याबाबत चौकशी अहवाल प्रशासनाने सादर केला नाही. तरी सदर प्रकरणात दोषी अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे.तरी लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्यात यावा यासाठी सभागृह नेते विनायक सिंहासने व भाजप संघटन सरचिटणीस दिपक माने यांनी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांना निवेदन दिले. लवकरात लवकर जर चौकशी अहवाल सादर केला नाही तर भारतीय जनता पार्टी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नगरसेवक युवराजजी बावडेकर, नगरसेवक राजेंद्रजी कुंभार , अभिमन्यू भोसले, ओबीसी युवा अध्यक्ष राहुल माने, कामगार आघाडी अध्यक्ष प्रियांनद कांबळे उपस्थित होते.