Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगछत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरू करणार, अजित पवारांची मोठी घोषणा

छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरू करणार, अजित पवारांची मोठी घोषणा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प  सादर केला. महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’ च्या घोषणा देत अजित पवार यांचे स्वागत केले. विकासाचे पंचसूत्री धोरणाअंतर्गत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथील संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरू करणार, अशी अजित पवारांनी घोषणा केली आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार  सादर करतील. महाविकास आघाडी सरकारचा  हा तिसरा अर्थसंकल्प आहे. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत.

अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषी संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -