ताजी बातमी ऑनलाइन टीम
यांच्याबाबतची एक मोठी बातमी हाती येते आहेत. शुक्रवारी भारतानं पाकिस्तानात चुकीनं मिसाईन (Indian Missile) डागलं गेल्याची वृत्त स्वीकरालं आहे. भारत सरकारनं याबाबत खेदही व्यक्त केला आहे. सुरक्षा मंत्रालयानं शुक्रवारी याबाबत अधिक माहिती जारी केली आहे.
9 मार्च 2022 वेळी तांत्रिक बिघाडामुळे आकस्मित मिसाईल डागली गेली. भारतानं याची गंभीर दखल घेत तातडीनं उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशीचे (Court Inquiry) आदेश जारी केले आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी भारताकडून मिसाईल डागण्यात आल्याचा दावा केला होता. पाकिस्तानाची पंजाब प्रांतात हे मिसाईल डागण्यात आलं होतं. पासिक्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजन जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबाबतचा दावा केला होता. भारताकडून झालेल्या तांत्रिक चुकीचा फायदा घ्यायचा पाकिस्तानच्या इशाद्यावर संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन पाणी फिरवले आहे. मात्र पाकिस्तानकडून सुरूवातील या घटनेचे भाडवल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.
नेमका घटनाक्रम काय?
सुरतगडमधून 6.43 मिनिटांनी एक मिसाईन डागलं गेलं.
पाकिस्तानात हे मिसाईल पडलं, तेव्हा वेळ होती 6.50 मिनिटं
तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचा भारत सरकार आणि
संरक्षण मंत्रालयाचा दावा
निर्जन वस्तीत मिसाईल पडल्यानं मोठा अनर्थ टळला.
ज्या पाकिस्तानी नागरिकाच्या जमिनीत हे मिसाईल पडलं, त्या ठिकाणच्या जमिनीचं नुकसान झाल्याचा दावा केला जातो आहे.
भारतातून आलेलं सुपर सोनिक फ्लाईंग ऑब्जेक्ट पाकिस्तानात जाऊन पडल्याचा दावा पाक सैन्याच्या प्रवक्त्यानं दिला होता, याचा व्हिडीओदेखील त्यांनी जारी केला होता.
अवघ्या तीन मिनिटात मिसाईलने 124 किलोमीटरचे अंतर कापल्याची माहितीही समोर आली आहे.
सुरक्षा मंत्रालयानं काय म्हटलंय?
पाकिस्तानच्या हद्दीत मिसाईल पडल्याच माहिती समोर आली आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं सुरक्षत्रा मंत्रालयानं म्हटलंय. पाकिस्ताननं गुरुवारी भारताकडून मिसाईल डागण्यात आल्याचा दावा केला होता. पाकिस्तानाची पंजाब प्रांतात हे मिसाईल डागण्यात आलं होतं. पासिक्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजन जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबाबतचा दावा केला होता. नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून 43 मिनिटांनी एक वेगवान वस्तू भारतीय हवाई क्षेत्रातून झेपावत आली. त्यानंतर मार्ग भटकून ही पाकिस्तानातील हद्दीत घुसली आणि कोसळली, असं मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटलंय.