कागल तालुक्यातील निढोरी मार्गावर व्हनुर फाटा येथे एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार बापुसो यशवंत तळेकर व सुरेश दिनकर तळेकर यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. दोघेही कागल तालुक्यातील केनवडे गावचे असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.
हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातातील मयत हे पितापुत्र असून ते पहाटे केनवडे गावाकडे मोटरसायकलवरून जात होते. त्यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये दोघेही जागीच ठार झाले.