केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. भविष्य निर्वाह निधीवर (provident fund) मिळणाऱ्या व्याजात मोठी कपात करण्यात आली आहे. ही कपात 1977-78 नंतरची सर्वात मोठी कपात आहे. केंद्र सरकारने ईपीएफओ (EPFO) अंतर्गत उपलब्ध पीएफचा व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
माहितीनुसार, ईपीएफओने2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केला आहे. गुवाहाटी येथे सुरू असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे आता त्याचे व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 22 मध्ये 8.10% ईपीएफओवर व्याज मिळेल. देशभरातील 7 कोटींहून अधिक ईपीएफओच्या सदस्यांसाठी मोठा धक्का आहे.
याआधी 1977-78 मध्ये सर्वात कमी व्याजदर होता. तेव्हा भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8 टक्के ठेवण्यात आला होता. यानंतर, ईपीएफचे व्याजदर आता या वर्षातील सर्वात कमी आहेत. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. या व्याजदरात कपात केल्यानंतर, पीएफ सदस्य आणि सदस्यांना त्यांच्या पीएफवर कमी व्याजदराने पैसे मिळतील.