Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीचा विवाह, पाच जणांविरूध्द गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विवाह, पाच जणांविरूध्द गुन्हा

भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह तालुक्यातीलच पिंपळगाव खुर्द येथील तरुणासोबत लावल्याचे प्रकरण उघडकीस आले. संबंधित प्रकरणी मुलीच्या आप्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवडच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती मिळाली होती. हा विवाह बोदवड येथे नातेवाईकांच्या संमतीने पार पडला होता. या संदर्भात प्रकल्प अधिकार्‍यांनी चौकशी केली असता बालिकेची जन्म तारीख कुटुंब सर्वे रजिस्टरमध्ये २६ नोव्हेंबर २००६ असल्याचे दिसून आले.

बालिकेचे वय केवळ १५ वर्षे तीन महिने १७ दिवस असतानाही ब्राम्हणासह व इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हा बालविवाह पार पडला. त्यामुळे बालिका अल्पवयीन असल्याची माहिती असूनही, लग्न लावल्याने पाच जणांविरुद्ध बालप्रतिबंधक अधिनियम २९९६ चे कलम ९,१०,११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती महिला व बालविकास अधिकारी प्रतीक पाटील यांनी  दिली.  दरम्यान संबंधीत अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -