ताजी बातमी ऑनलाईन टीम
पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काॅंग्रेस जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर पक्षाने काॅंग्रेस कार्यकारिणी समितीने (CWC) बैठक सुरू झालेली आहे. पराभवाची समिक्षा आणि भविष्यातील रणनिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी गांधी परिवाराचे सदस्य आपल्या संघटनात्मक पदांवरून राजीनामा देणार आहे, अशा बातम्यांचे काॅंग्रेस पक्षाने खंडन केलेले आहे. यासंदर्भातील १० महत्वाचे मुद्दे पाहुया…
१) पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये काॅंग्रेसचा पराभव झालेला आहे. मागील काही वर्षांपासून पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही निवडणुकांच्या प्रचारामध्ये आपला सहभाग नोंदवला नाही. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दोघेच स्टार प्रचारक राहिले आहेत.
उत्तर प्रदेशच्या प्रभारी सचिव प्रियंका गांधी यांच्या जबरदस्त प्रचारानंतरही काॅंग्रेसच्या राज्यातील ४०३ जागांपैकी केवळ २ जागाच वाट्याला आहेत. संपूर्ण मतदानातील टक्केवारी कमी होऊन ती २.३३ टक्क्यांवर आलेली आहे. काही उमेदवारांची डिपाॅझिटही जप्त झालेली आहेत.
३) २०१९ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सामान्य निवडणुकांमध्येही सलग दोन वेळी काॅंग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. शेवटी हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींनी पक्षाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी २०२० मध्ये पक्षातील काही नेत्यांनी ‘G-23’ द्वारे बंडखोरी केल्यामुळे पदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता. पण, CWC ने पदावर राहण्याचा हट्ट केला.
४) पाच राज्यांमध्ये काॅंग्रेसच्या जबरदस्त पराभवामुळे ‘G-23’मधील नेत्यांनी शुक्रवारी भविष्यातील रणनितीची चर्चा केली. ही बैठक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झाली. त्यामध्ये कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि मनीश तिवारी देखील सहभागी होती.
५) सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार ‘G-23’ नेते पराभवाचा विचार करून विविध बदल पक्षाच्या संघटनात्मक केले जातील. ‘G-23’ समूहाचे प्रमुख सदस्य गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा CWC मध्ये सहभागी आहेत.
६) लोकसभेतील काॅंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “मी मान्य करतो की, आमच्या संघटनात्मक कमजोरींमुळे आमच्या वाट्याला पराभव आला आहे. मात्र, पक्षाच्या नेतृत्वामध्ये बदल करण्याची आवश्यता नाही.”
७) काॅंग्रेसच्या पराभवानंतर गांधी घराण्यातील विविध संघटनात्मक पदावरील सदस्य राजीनामा देणार आहे, अशा बातम्यांचा खंडन काॅंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी केले आहे.
८) सुरजेवाल म्हणाले, “एका वृत्तवाहिनीसाठी सत्ताधारी भाजपाच्या इशाऱ्या काल्पनिक सोर्स तयार केले जातात. त्यांच्याद्वारे निराधार आणि दुष्प्रचार करत नव्या गोष्टी पेरल्या जातात.” काॅंग्रेसचे नेते मणिकम टागोरे म्हणाले की, “अफवा पसरविणाऱ्या चेहरे थोड्याच वेळात पडलेले दिसतील.”
९) काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी भविष्यातील निवडणुकांमध्ये योग्य परिणाम हवे असतील, तर पक्षामध्ये संपूर्णपणे पूनर्रचना करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, शिर्ष स्तरावरील कोणताही बदल करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला नाही.
१०) पाच राज्यांतील पराभवामुळे काॅंग्रेस नेता पवन खेडा यांनी शनिवारी ट्विटरवर पक्षाच्या सदस्यांना सांगितले आहे की, “विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून निराश होण्याचं कारण नाही. आपण आणखी जोशाने काम करू”, असा प्रोत्साहनपर वक्तव्य केलेले आहे.