Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी

शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी

बोलेरो कार आणि ट्रक यांचा भीषण अपघात  झाल्याची घटना समोर आली आहे. बुलडाणा  जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर देऊळगाव राजा जवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये कार चालकाचाही समावेश आहे. तर चौघे जण जखमी झाले आहेत. जालना येथून शेगाव  येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविक निघाले होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यावेळी बोलेरो कारची ट्रकसोबत भीषण धडक झाली. सोमवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

युक्रेनच्या तळावर रशियाचा हल्ला; 35 जणांचा मृत्यू

देऊळगाव राजा जवळ भाविकांच्या बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाल्याने अपघात झाला.

या अपघातात पाच जण जागीच मृत्युमुखी पडले असून चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बोलेरो चालक, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

अपघातग्रस्त बोलेरो गाडी भाविकांना घेऊन जालना येथून शेगाव येथे गजानन महाराज दर्शनासाठी निघाली असल्याची माहिती आहे. जखमींवर देऊळगाव राजा तसेच जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास घडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -