नाशिक जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याचा ( अक्षरशः धुमाकूळ सुरूय. आता इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे गावात आपल्या झोपडीत झोपलेल्या महिलेला बिबट्याने उचलून नेत अक्षरशः तिचे लचके तोडून ठार केल्याचे समोर आले आहे. यामुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून, आम्ही घरात रहायचे की नाही, असा सवाल नागरिक करत आहेत. नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होतेय. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात बिबट्याविरुद्ध मानव हा संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र, आता बिबटे कमालीचे आक्रमक झालेत. शेतकऱ्यांना (Farmers) शेतात जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. आता त्यांनी थेट घरात धडक दिलीय. काही दिवसांपूर्वी अंगणात खेळणाऱ्या एका बाळाला बिबट्याने उचलून पळ काढला होता. मात्र, मुलाच्या आईने निकराचा प्रतिकार केल्याने हे बाळ बचावले. आता तर एका ज्येष्ठ महिलेलाच उचलून नेल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजलीय.
बॉलीवूडच्या खिलाडीकडून श्रेया बुगडेचं तोंडभरून कौतुक, खास मोबाईल फोन दिला गिफ्ट!
इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरेमध्ये शकुंतला अमृता रेरे (वय 55) या राहतात. गावातील घाटनदेवी मंदिराच्या शेजारी त्यांचे शेत आहे. या मळ्यात सहा शेळ्या आहेत. त्यांची राखण करण्यासाठी शंकुतला या शेतात रहायच्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढलाय. रात्री खूप उकाडा जाणवत असल्याने त्यांनी आपल्या झोपडीचे दार उघडे ठेवले होते. रात्री नऊच्या सुमारास अचानक बिबट्याने झोपडीत प्रवेश केला. शकुंतला यांना तोंडात धरून ओढून नेले. त्यांचा पोट्याच्यावरचे लचके तोडून खाल्ले. सकाळी त्यांचा मृतदेह मिळाला. त्यांच्यामागे दोन मुली व एक मुलगा आहे.